JEE/NEET/MHT-CET – 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाइन प्रशिक्षणासाठी योजनचे तपशील
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती- विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch – 2025-27 या प्रशिक्षणासाठी मोफत ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचे आहेत. सदर योजनेंतर्गत महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डेटा उपलब्ध करून देण्यात येईल.
अ. योजनेंतर्गत लाभार्थी पात्रता:
- विद्यार्थी महाराष्ट्राचे रहिवासी असावा/असावी.
- विद्यार्थी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/असावी.
- सन-2025 मध्ये इयत्ता 10 वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल.
- विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. या बाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे, जोडणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांची निवड ही त्यांनी इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
ब. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (पुर्वीचा व सध्याचा बायोडेटा)
- रहिवासी दाखला (Domicile Certificate)
- जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
- वैध नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र (Valid Non-Creamy Layer Certificate)
- इयत्ता 10 वी ची गुणपत्रिका
- इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला (बोनाफाईड सर्टिफिकेट) व प्रवेश पावती
- दिव्यांग असल्याचा दाखला
- अन्य असलेल्या दाखले
क. आरक्षण :
- सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:
अ.क्र. | सामाजिक प्रवर्ग | टक्केवारी |
---|---|---|
1 | इतर मागास वर्ग (OBC) | 59% |
2 | विमुक्त जाती – अ (VJ-A) | 10% |
3 | भटक्या जमाती – ब (NT-B) | 8% |
4 | भटक्या जमाती – क (NT-C) | 11% |
5 | भटक्या जमाती – ड (NT-D) | 6% |
6 | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 6% |
एकूण | 100% |
- समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे:
- प्रवर्गांतील महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहेत.
- दिव्यांगांसाठी 4% जागा आरक्षित आहेत.
- अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहेत.
- ➤ अटी व शर्ती :
- अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31/05/2025 आहे.
- पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व निवडकरता तसेच निवडीनंतर पहिली बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकिय संचालक, महाज्योती यांचेकडे राहतील.
- कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रिया दर्शविणे किंवा प्रशिक्षणात कोणत्याही प्रकारची उभेदभावाची सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
- अर्ज भरण्याची फी : Service Charges by Akash Computers
- 150 प्रती विद्यार्थी
- 📞 अर्ज भरण्यासाठी संपर्क (For Form Filling Assistance)
नाव | संपर्क क्रमांक |
---|---|
आकाश कॉम्प्युटर्स (Male) | 9595030385 |
आकाश कॉम्प्युटर्स (Female) | 9503332278 |