ऑपरेशन करताना डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचाच पोषाख का घालतात? जाणून घ्या

hopsital inmarathi

हॉस्पिटल लहान असो वा मोठं… त्यातील अनेक बाबींमध्ये समानता दिसून येते. त्यातली सर्वात मोठी बाब म्हणजे धावपळ करणाऱ्या डॉक्टरांच्या अंगावर असलेला निळा किंवा हिरव्या रंगाचा कोट.

हा त्यांचा गणवेश असतो का? तर याचं उत्तर मिळतं ‘नाही’. डॉक्टरांसाठी लिखित स्वरुपात कोणत्याही प्रकारचा गणवेश नोंदवलेला नसतानाही प्रत्येक हॉस्पिटलमधले डॉक्टर ऑपरेशन करताना ठराविक रंगाचा वेश का परिधान करतात? तुमच्याही मनात कधी ना कधी हा प्रश्न डोकावला असेलच.

doctor dress inmarathi

जाणन घेऊयात त्यामागची ही रंजक कारणं…
मानवाचं संपूर्ण आयुष्य रंगानं व्यापलेलं आहे. रंगांचं महत्व इतकं आहे की आपल्या मानसिकतेवरही ते परिणाम करत असतात. कलर थेरपी हे शास्त्र जास्तीत जास्त परिणामकारकतेनं वापरलं जात आहे. याचाच संबंध आहे हॉस्पिटलमधल्या हिरव्या, पांढर्‍या आणि निळ्या रंगाच्या वापराशी-

रंग आणि मूड, रंग आणि व्यतिमत्व, रंग आणि संगीत इतकंच काय रंग आणि हॉस्पिटल/पेशण्टस याचा संबंध खूप निकटचा असतो. रंग आपला मूड बिघडवतातही आणि तो चांगलाही करतात. एखादं गाणं ऐकताना डोळे बंद केले तर डोळ्यासमोर विशिष्ट रंगछटा तरळून जातात याचं कारण असतं आपली मनोवस्था. त्या त्या मूडनुसार तो तो रंग आपल्याला दिसत जातो.

उदाहरणार्थ पिवळा रंग उत्साह आणि उर्जेचा आहे, लाल रंग संताप, लालसा, आनंद अशा टोकाच्या भावनांचा आहे. पांढरा शांततेचा, हिरवा प्रसन्नतेचा, निळा शांत गंभीर. रंगांची निवड ही या भावनांवर आधारीत असते.

सोप्या भाषेत सांगाचंय तर आलेला राग प्रकट करण्यासाठी आपण कायम लाल रंगाचा वापर करतो, जरा आपल्या फोनमधील ला इमोजी बघा.

emoji inmarathi
दवाखाना, हॉस्पिटल म्हंटलं, की तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? पांढर्‍या टाइल्सच्या भिंती, निळ्या, हिरव्या पोषाखातले डॉक्टर्स, पांढर्‍या ॲप्रनमधल्या नर्स, हॉस्पिटलमधलं फ़र्निचरही पांढर्‍या रंगाचं असतं. हे तीन रंगच का वापरले जात असावेत? कधी विचार केलाय?

पूर्वी सर्जरी करतानाही डॉक्टर्स पांढरे कपडे वापरत असत. नंतर मात्र ते निळे किंवा हिरवे झाले त्याचप्रमाणे ऑपरेशन थिएटरमधले बेडशिटस आणि इतर कापडं हिरव्या रंगाची वापरण्यात येऊ लागली.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला हा रंगबदल झाला. याचं कारण म्हणजे ऑपरेशन थिएटरमधे डॉक्टर्सना फार बारकाईनं आणि काळजीपूर्वक बघावं लागतं. यानं डोळ्यावर ताण येतो. काही काही ऑपरेशन्स ही अनेक तास चालतात. अशा वेळेस लाल, पिवळा हे रंग डोळ्यांवर अतिरिक्त ताण आणणारे असतात.

हिरवा आणि निळा या रंगांंकडे मात्र कितीही काळ पाहिलं तरिही डोळ्यांवर ताण येत नाही. डॉक्टरांच्या ‘क्लिअर व्हिजन’ साठी या दोन रंगांची मदत होते.

ऑपरेशन करताना शरीराचा आतला रक्ताळलेला भाग सतत डोळ्यासमोर असल्यानं याचा मेंदूवर ताण येतो. हिरव्या रंगामुळे थोडं लक्ष विचलित किंबहूना शांत होण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे शरिरातील गुंतागुंतीची रचना सर्जनला हाताळायची असते. अशावेळेस अधूनमधून जर हिरवा रंग नजरेसमोर येत राहिला तर व्हिजन क्लॅरिटी राखायला मदत होते, eye sensitivity राखली गेल्यानं लाल रंगाच्या छटातले फरक ओळखता येतात.

रंग मानसोपचारतज्ज्ञांच्यामते पांढर्‍या रंगापेक्षा हिरवा आणि निळा रंग जर सर्जरी दरम्यान सर्जनच्या नजरेसमोर असतील तर लक्ष विचलीत न होता एक डायव्हर्शन मिळतं.

green and blue inmarathi

पांढरा रंग जर ऑपरेशन थिएटरमधल्या प्रखर उजेडात समोर असेल आणि सर्जननं मधूनच पांढर्‍या रंगाकडे पाहिलं तर कॅमेरा फ्लॅशचा इफेक्ट डोळ्यांवर होतो. त्याऐवजी जर समोर हिरवा रंग असेल तर डोळ्यांना त्रास होत नाही. हिरवा आणि लाल हे रंग परस्परांच्या अगदी विरूध्द रंग असल्यानं याची मदत होते.

पूर्वी हॉस्पिटलमधील कर्मचारी, डॉक्टर्स, पेशंट सगळेच पांढर्‍या रंगाचा पेहराव करत असत. मात्र १९१४ मधे एका नामांकित, प्रतिथयश डॉक्टरनी या पारंपारिक वेशात बदल करत त्याचा रंग हिरवा केला.

dress inmarathi

जर तुम्ही कधी बारकाईनं निरिक्षण केलं असेल तर बहुतांश हॉस्पिटलमधले पडदेही हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात.

टुडे सर्जिकल नर्सच्या १९९८ च्या एका अंकात प्रसिध्द झालेल्या रिपोर्टनूसार, जेंव्हा आपण सलग बराच काळ एखाद्या रंगाकडे सतत बघत रहातो तेंव्हा एक विचित्रप्रकारचा तणाव मेंदूवर येतो आणि डोळ्यांना थकवा जाणवू लागतो.
सूर्याच्या प्रखर किरणांकडे कधीतरी बघा, काय होतं? डोळे चमकतात आणि नंतरचा काही काळ काहीच दिसेनास होतं, सगळं काळं दिसतं. म्हणजेच रंग गायब होतात. याचं कारण त्या प्रखरतेनं डोळ्यांवर आलेला ताण.

अशावेळेस जर हिरव्या रंगाकडे बघितलं तर डोळ्यांना थंडावा मिळतो. याच कारणामुळे सर्जरी दरम्यान डॉक्टरांनी हिरवा रंग वापरायला सुरवात केली.

निसर्गाची किमयाच अशी आहे की मानवी मेंदू हिरवा, निळा, लाल हे तीन रंगच बघू शकतो आणि ते रंग थेट मेंदुपर्यंत पोहोचतात. बाकी सगळे रंग या तिघांच्या मिश्रणातून बनले आहेत जे मानवी मेंदू पटकन टिपू हळुवार शकतो. यातही हिरवा आणि निळा रंग मानवी डोळे लाल रंगाच्या तुलनेत जलद बघतात. तिथे लक्ष पटकन जातं.
हिरव्या झुडुपात लाल फूल फूललेलं असेल तर डोळे आपोआपच आधी हिरवा रंग बघतात आणि मग लाल. डोळ्यांना हिरवा आणि निळा रंग कधीच ‘टोचत’ नाहीत. लाल आणि पिवळा रंगाचं मात्र तसं नाही.

ते बरेचदा डोळ्यांना त्रास देणारे असतात. म्हणूनच हॉस्पितलमधले पडदे निळ्या रंगाचे असतात. आलेल्या पेशंटचं मन शांत रहावं, पेशंट्सोबत असणार्‍याचा तणाव आपसूक कमी व्हावा हा यामागचा उद्देश असतो.

icu inmarathi

एकंदरित हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा पोषाखाचा रंग हा त्यांच्या सोईसाठी नसून रंगसंगतीचा सकारात्मक परिणाम हा डॉक्टरांच्या कामावर व्हावा यासाठी तयार करण्यात आला आहे. डॉक्टरांसह पेशंट्सचा विचार करून हॉस्पिटलमधील इतर साधनांच्या रंगांचा विचारही केला जातो.

This Post Has One Comment

Leave a Reply