फेब्रुवारी महिना म्हटला कि, ‘व्हॅलेंटाईन वीक’ ची आतुरतेने वाट पाहणारी तरुणाई अनेक प्लॅन करण्यात गर्क असते. यंदा कसा आहे ‘व्हॅलेंटाईन वीक’? कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार आहे? सविस्तर जाणून घेऊयात…
7 फेब्रुवारी – रोझ डे : व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात खऱ्या अर्थाने आजच्या दिवसापासून होते. आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाचे प्रतिक असलेल्या गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. हल्ली विविध रंगी गुलाब बाजारात उपलब्ध आहेत. यासाठी तुमची भावना व्यक्त करणारा गुलाब निवडा.
8 फेब्रुवारी – प्रपोज डे : आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे प्रपोज डे. हा दिवस कसा अविस्मरणीय करता येईल? याचा विचार करा आणि त्याप्रमाणे प्लॅन करा.
Also Read: तपासून पहा, तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहात का?
9 फेब्रुवारी – चॉकलेट डे : प्रेमाचा गोडवा वाढण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देवून हा दिवस स्पेशल केला जातो. सध्या चॉकलेटचे अनेक पर्याय उपलब्ध असून यापैकी बेस्ट ऑप्शन निवडून तुम्ही हा दिवस स्पेशल करू शकता.
10 फेब्रुवारी – टेडी डे : या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी बिअर भेट देण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपल्या प्रियकराची आवड ओळखा. त्यानुसार एक छानसा टेडी भेट म्हणून द्यायला विसरू नका.
11 फेब्रुवारी – प्रॉमिस डे : या दिवशी प्रेमी एकमेकांना नेहमी साथ देण्याचे प्रॉमिस करतात. यामुळे तुमचा एकमेकांवरील विश्वास आणखी दृढ होतो आणि नातं मजबूत होत जातं.
12 फेब्रुवारी – ‘हग डे’ : प्रेम व्यक्त करण्याचं सुंदर माध्यम एकमेकांना आलिंगन (हग) देणे. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत हा दिवस साजरा करून तुमचं नातं आणखी घट्ट करा.
Also Read: ‘या’ देशांमध्ये आहे 36 चा आकडा
13 फेब्रुवारी – किस डे : या वीक मधला हा सर्वात रोमॅंटिक दिवस आहे. कारण या दिवशी प्रेमीयुगूल ‘किस’ करून त्यांच्या भावना व्यक्त करतात.
14 फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन्स डे : संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. प्रेमी जोडप्यांसाठी हा दिवस अतिशय स्पेशल असा असतो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट देऊन सरप्राईझ तसेच आपले प्रेम व्यक्त करण्याचा देखील बेत आखला जातो.
कशी वाटली माहिती? आम्हाला नक्की कळवा. तसेच अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इतर पेजला फॉलो करायला विसरू नका
Pingback: तपासून पहा, तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहात का? | महासेवा