यूपीएससी 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे.
UPSC Result : केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 (UPSC 2021) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चार स्थानांवर मुली आल्या आहेत. 2021 च्या यूपीएससी निकालाचं हे मोठं वैशिष्ट्य आहे. श्रुती शर्मा पहिल्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. तर अंकिता अग्रवालने दुसऱ्या क्रमांक पटकावला आहे. तिसरा क्रमांक गामिनी सिंगला तर चौथा क्रमांक ऐश्वर्या शर्माने पटकावला आहे.
यावर्षी 685 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या नियुक्तीमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील 40 हून अधिक उमेदवारांना यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळाले आहे. या निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं 97 वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने 248 वा क्रमांक पटकावला आहे. तर रोशन देशमुखने 451 वा आणि अश्विन गोळपकरने 626 वा क्रमांक पटकावला आहे.
UPSC CSE प्राथमिक परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली आणि परीक्षेचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्य परीक्षा 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली होती आणि निकाल 17 मार्च 2022 रोजी जाहीर करण्यात आला. मुलाखत ही परीक्षेची शेवटची फेरी होती, जी 5 एप्रिल रोजी सुरु झाली आणि 26 मे रोजी संपली होती. आज या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.
यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले पहिले 10 विद्यार्थी
- पहिला क्रमांक : श्रुती शर्मा
- दुसरा क्रमांक : अंकिता अग्रवाल
- तिसरं क्रमांक : गामिनी सिंगला
- चौथा क्रमांक : ऐश्वर्य वर्मा
- पाचवा क्रमांक : उत्कर्ष द्विवेदी
- सहावा क्रमांक : यक्ष चौधरी
- सातवा क्रमांक :सम्यक एस जैन
- आठवा क्रमांक : इशिता राठी
- नववा क्रमांक : प्रीतम कुमार
- दहावा क्रमांक : हरकीरत सिंह रंधावा
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा 2021 चा अंतिम निकाल आज लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज निकाल जाहीर झाला आहे. युपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले आणि मुलाखत दिलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहू शकतील. उमेदवारांनी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.
आत्तापर्यंत UPSC ने निकाल जाहीर करण्याची कोणत्याही तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नव्हती. मात्र मागील वर्षाच्या निकालाचा विचार करता 30 मे 2022 रोजी अंतिम निकाल लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) साधारणपणे शेवटच्या मुलाखतीच्या तारखेनंतर दोन दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची पद्धत आहे.
महाराष्ट्रातून प्रियवंदा म्हाडदळकर प्रथम
युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्रियवंदा अशोक म्हाडदळकर (Priyamvanda Mhaddalkar) हीने पटकावला आहे. तर श्रुती शर्मा ही देशातून पहिली आलेली विद्यार्थीनी आहे. हा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
प्रियवंदा ही महाराष्ट्रातून पहिली आली असून देशातून तिचा तेरावा क्रमांक लागला आहे. दरम्यान देशातील अव्वल पाच उमेदवारांमध्ये चार मुलींचा सामावेश आहे. महाराष्ट्रातील २८ विद्यार्थ्यांची यादी हाती आली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर प्रियवंदा म्हाडदळकर आहे. देशातून श्रुती शर्मा प्रथम, अंकिता अगरवाल द्वितीय तर गामिनी सिंगला हीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली असून देसभरातून त्यांचं कौतुक होत आहे.
महाराष्ट्रातील या उमेदवारांनी मारली बाजी
- 1) प्रियंवदा म्हाद्दळकर (१३)
- 2) ओंकार पवार (१९४)
- 3) शुभम भोसले (१४९)
- 4) अक्षय वाखारे (२०३)
- 5) अमित लक्ष्मण शिंदे (५७०)
- 6) पूजा खेडकर (६७९)
- 7) अमोल आवटे (६७८)
- 8) आदित्य काकडे (१२९)
- 9) विनय कुमार गाडगे (१५१)
- 10) अर्जित महाजन (२०४)
- 11) तन्मय काळे (२३०)
- 12) अभिजित पाटील (२२६)
- 13) प्रतिक मंत्री (२५२)
- 14) वैभव काजळे (३२५)
- 15) अभिजित पठारे (३३३)