उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छांयाकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रिय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक येथे दिं. १६/०६/२०२२ ते दि. २७/०६/२०२२ रोजी संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुटीचे दिवस वगळुन व्यक्तीश:/पोस्टाने सादर करावेत.वेळेनंतर प्राप्त अर्ज (व्यक्तीश:/पोस्टाने) स्विकारले जाणार नाही.
मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही . तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर रु ५/- टपाल तिकिट लावुन अर्जासोबत जोडावा.
खुल्या प्रवगातील पदाकरीता रु. १५०/- व राखिव प्रवर्गातील पदाकरीता रु १००/- खाते क्रमांक “60403391534, IFSC Code – MAHB0001321 वर RTGS / NEFT / IMPS द्वारे भरणा करून पावती लिफाफ्यामध्ये टाकावी.
खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रे सांक्षाकीत केलेल्या प्रती अर्जाच्या नमुन्याला जोडाव्यात.
शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रके
जात / वैधता प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
पासपोर्ट आकाराचे २ फोटो
शासकिय अनुभव असेलेल प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र सोबत नियुक्ती आदेश तथा प्रमाणित पेमेंट स्लिप वा पेमेंट जमा झाल्याचे बॅक पासबुक. (असल्यास)
अटि व शर्ती
उपरोक्त पदे हि अंत्यत कंत्राटी स्वरुपाची असुन नियुक्ती १२ महिने कालावधीची राहील, शासनाने सदर पदे नामंजुर केल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल
जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसुन निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाहि तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाही, तसेच अर्जदाराला शासकिय नियमित सेवेत सामावुन घेणे किंबा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दुष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
सेवानिवृत्त विशेषतज/कर्मचारी याचे निवड झालेस सदर पदाकरिता मालश्रसत राज्य स्तरावरून प्राप्त विहीत मार्गदर्शक सुचनांनुसार मोजमाप करुन अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी .
जाहिरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणमध्ये बदल होऊ शकतो . याबाबतचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नाशिक यांनी राखन ठेवले आहेत.
अनुभवी व उच्च शैक्षणिक अर्हता धारकास प्राधान्य दिले जाईल.
एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदाकरीता स्वंतत्र अर्ज सादर करावेत.
एकापेक्षा अधिक पदांकरीता अर्ज करताना अर्जासोबत, पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे पुर्वी कार्यालयास सादर करावा.
निवड यादीरतील गुणक्रमांकाचे आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवाराने कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रदद करण्यात येईल.