- निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मुंबई: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board) वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Result 2023) गुरुवारी (२५ मे रोजी) दुपारी २ वाजता लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बारावीच्या निकालाबाबत सोशल मीडिया आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये विविध दावे केले जात होते. त्यातील काही अहवालांमध्ये बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान बारावीचा निकाल गुरुवारी दुपारी २ वाजता जाहीर होणार असल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यंदाचा निकाल नेमका कसा लागणार? याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागून आहे.
- गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
- असा पाहता येईल बारावीचा निकाल
- बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वप्रथम मंडळाशी संलग्न अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि msbshse.co.in वर भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होमपेजवरील निकाल या पर्यायावर क्लिक करावे लागेल
- क्लिक केल्यास एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल
- त्यानंतर महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा
- इथे लॉगिन पेजवर, तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा
- सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- आता डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा
Hii