You are currently viewing तपासून पहा, तुम्ही मोबाईल अ‍ॅडिक्ट आहात का?

तपासून पहा, तुम्ही मोबाईल अ‍ॅडिक्ट आहात का?
हल्ली मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ आणि मेंदूच्या अनेक समस्यांनी आपले डोके वर काढले आहे. अशात आपण खरंच इतके मोबाईलच्या आहारी गेलो आहोत काय? एकदा तपासून घेण्याची वेळ आली आहे. खालील पद्धतीने तपासून पाहा तुम्ही मोबाईल अ‍ॅडिक्ट आहात कि नाही?

1. तुम्ही सलग थोडा वेळ मोबाईलवर मेसेज किंवा फोन न आल्यास नेटवर्क कनेक्शन तपासून पाहता का?

2. झोपण्यापूर्वीची शेवटची आणि जाग आल्यानंतरची पहिली कृती फोन पाहणे हीच असते का?

3. एखाद्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी मोबाईलवरील अलार्मवर अवलंबून असता का?

4. तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी मला फोन करावा आणि सतत फोन येणं सुरू असावं.

Also Read: यंदा व्हॅलेंटाईन वीक कसा आहे?

5. आपला फोन सतत आपल्या हातात हवा असे वाटते का, कुणाला तरी मेसेज करावा किंवा नविन मेसेज येत राहावेत असं वाटतं का?

6. कामाची बैठक किंवा प्रवासादरम्यान मोबाईल वापरता न आल्यास अस्वस्थ वाटतं का?

7. गाडी चालवताना फोन आला तर लगेचच त्याला उत्तर देण्याची तुम्ही घाई करता का?

वरील प्रश्नाचं उत्तर ‘हो’ असेल तर तुम्ही मोबाईल अ‍ॅडिक्ट आहात असे समजा.

कशी वाटली माहिती? आम्हाला नक्की कळवा. तसेच अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या इतर पेजला फॉलो करायला विसरू नका.

This Post Has 2 Comments

Leave a Reply