तरुण व होतकरु तरुण /तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक/अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण पाठयक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठयक्रम (कालावधी ०६ महिने) व अधिकारी पाठयक्रम (कालावधी ०१ वर्ष हे दोन्ही पाठयक्रम निवासी असून या पाठयक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टीकोनातून हे पाठयक्रम आयोजित करण्यात येतात.
पाठयक्रम :
अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम (पुरुष व महिला उमेदवारांकरीता. ३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा पाठयक्रम आयोजित करण्यांत येईल).
उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम (फक्त पुरुष उमेदवारांकरीता- पाठयक्रमाची क्षमता ४०)
प्रवेशासाठी पात्रता :
खाली नमूद केल्याव्यतिरिक्त अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे व त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे. सदर बाब शैक्षणिक व कागदपत्रांची पडताळणीच्या वेळी बघितली जाईल.
अटी
अग्निशामक पाठयक्रम
उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम
वय
18 ते 23 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
18 ते 25 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता
पहिल्या प्रयत्नात 10वी उत्तीर्ण
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उतीर्ण.
शारीरिक पात्रता:
पाठयक्रम
उंची
छाती
वजन
अग्निशामक पाठयक्रम [पुरुष]
165
81 cm – 86 cm
50 kg
अग्निशामक पाठयक्रम [महिला]
157
–
46 kg
उपस्थानक अधिकारी [पुरुष]
165
81 cm – 86 cm
50 kg
FEE
अग्निशामक पाठयक्रम
उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम
खुला
500
600
इतर
400
450
वैद्यकीय मापदंड:
डोळे : अर्जदार डोळयांनी रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी ६/६ असणे आवश्यक आहे.
कोणत्याही प्रकारचे कान, नाक व घसाचे आजारे नसणे. व्यवस्थित ऐकू येणे.
या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे.
हाडांचा किंवा सांध्याचा आजार.
पूर्व मानसिक आजार
त्वचेचा आजार
सपाट पाय किंवा गुडघे टेकलेले
रक्त वाहिनी फूगणे
तिरकस डोळे
कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंगत्व नसावे.
मोठया प्रमाणात शस्त्रकिया झालेली नसावी
ऐकू न येणे किंवा बोलतांना अडथळणे (बोबडेपणा)
कोणत्याही प्रकारचे अपंगत्व, जेणेकरुन अग्निशमन किंवा विमोचन कार्य करतांना त्रास होऊ शकतो.
अग्निशमन सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टीप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक /अधिकारी यांची मोठया प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले लातात. जरी हे क्षेत्र तरुण तडफदार युवकासाठी असले तरी प्रथमच तरुण युवतींसाठी पाठयक्रम आयोजित करण्यंत येत आहे. जर ३० महिला उमेदवार उपलब्ध झाल्यास हा त्यांचेसाठी अग्निशामक पाठयक्रम आयोजित करण्यात येईल.
पाठयक्रमासाठी येणारा अंदाजित खर्चाचा तपशिल:
खर्चाचा तपशील
अग्निशामक पाठयक्रम
उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठयक्रम
प्रशिक्षण शुल्क
13000 रुपये
36400
निवास खर्च
50 ते 70 रुपये / प्रतिदिन
100 रुपये / प्रतिदिन
ट्रेनी ॲमिनिटी
2000 रुपये
3000
जेवणाचा खर्च (अंदाजे)
300 रुपये / प्रतिदिन
300 रुपये / प्रतिदिन
गणवेष व इतर साहित्य
10000 रुपये
10000 रुपये
शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी लागणार महत्वाची कागदपत्रे